Welcome to the Insaff Foundation

Our Work

Home / Our Work

धन्यवाद दैनिक सकाळ

समर्पित समाजयोद्धा "मुस्तफा"

म्हातारी मेली तरी चालेल

म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावयाला नको अशी आपल्याकडे म्हण आहे मित्रांनो पण शब्दशाः म्हातारी मरायला हवी का ? आज सावली बेघर निवारा केंद्रा समोर कोण दोन अज्ञात व्यक्तीनी एका म्हातारीला आणून अक्षरशः संस्थेच्या दारात टाकून पळ काढला आहे. हा काळ सोकावयाचा काळ नाही कसं म्हणणार सांगा ? १ आॕक्टोंबर हा जागतिक वृध्दसेवा दिन आहे आणि अवघ्या दोन दिवस अगोदर अशी घटना घडते आहे हे किती घृणास्पद कृत्य आहे नवरात्रीचा उत्सव जोरदार चालू आहे.आई भवानी आई आंबाबाई, आई रेणूका,अशा कितीतरी आदीशक्तीची आपण रोज मनोभावे पुजाअर्चा करतो कशासाठी हा प्रश्न गरब्याचा फेर धरावा असा भोवती सतत फिरत राहतो रोज एका रंगाचे कपडे घालणाऱ्या महिलांना रोज पाहताना त्यांच्या रंगीबेरंगी झगमगाटात काळी बाजू आपल्याला दिसत नाही याची खंत मनात घर करते. पायात चप्पल न घालता अनेक तरूणही हल्ली आपल्याला दिसतात पण काढलेले पायताण आज आपल्याच तोंडावर मारून घेण्यासारखी कृती कोणी केली असेल ? का कशासाठी असे अनेक प्रश्न उभे राहतात त्या म्हातारीला अश्रा मिळेल सेवा मिळेल वैद्यकीय मदत मिळेल परंतु तिला आपल्यालाच माणसांनी असं का केलं या प्रश्नांची उत्तरे मात्र आज मुस्तफाकडे नाहीत. कुठं चाललो आहोत आपण की आपल्या स्वार्थी आणि भौतिक सुखाच्या भोवतीच आपण फेर धरणार आहोत का ? आपला परीघ मोठा व्हायला हवा.दृष्टी व्यापक व्हायला हवी सेवाआस्थेची व्हायला हवी. हा सोकावणा-या काळाला म्हातारीच काही देणंघेणं नाही तेव्हा विचार करा मित्रांनो समाजभान म्हणून आपली जबाबदारी वाढते आहे. डेटापॕक मारून केवळ दैनंदिन दिवशी संवेदना व्यक्त करणाऱ्या पोस्ट लिहिणे फोटो अपलोड करणे म्हणजे समाजसेवा नाही या पलिकडे पाहायची नवी दृष्टी हवी इतकेच वाटतं अभिजित पाटील

इस बुढी औरत का घर जल गया था तो इन्साफ ने और श्री नीधी के ओर से छोटी सहायता की

इस बुढी औरत का घर जल गया था तो इन्साफ ने और श्री नीधी के ओर से छोटी सहायता की